वेळ: सोमवार ते शनिवार 24 तास
स्थापना - 26 जून 2020 कार्य- भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुलांना आधार देणारी संस्था अनाथ- निराधार, ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर व इतर घटकातील शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ही संस्था काम करत आहे. या संस्थेसाठी विविध घटकातील दानशुर मंडळी नेहमीच हातभार लावते. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही संस्था गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे उभी आहे. व विदयार्थ्यांनसाठी कार्य करत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देखील राबवले जातात चित्रकला, हस्तकला, मुर्तीकला, सामुहिक गीतगायन मैदानी खेळ असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना हसत-खेळत शिक्षण दिले जाते. तसेच मुलांचे पालनपोषण देखील केले जाते.
1. सकाळचा नाश्ता 2. दुपारी जेवन 3. संध्याकाळी जेवन 4. शैक्षणिक साहित्य वहया, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, फुलपट्टी, रंगपेटी, शाळेची बॅग, शुज, शॉक्स, 5. कोलगेट ब्रश, अंघोळीची व कपडयाची साबण, तेल, टॉवेल, अंडरवेअर, बनियन दिले जाते. For us, just as for every other business, economical success is the basic foundation for fulfilling our mission. This we can only achieve together with the people we work for and with. Therefore they are at the centre of our thinking and doing.
प्रत्येक आठवडयांला स्थानिक आरोग्य केंद्रात मुलांना नेवून त्यांचे चेकअप केले जाते, तसेच या संस्थेमध्ये इतर खाजगी डॉक्टराची सुध्दा विजीट असतात. विजीट झाल्यानंतर त्या त्या डॉक्टराकडून मुलांची मोफत तपासणी करुन सर्व औषधे मोफत दिले जातात. कारण शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्य सुध्दा महत्वाचे आहे. या संस्थेत येणारी सर्व मुले गेल्या 3 वर्षापासून हसत खेळत शिक्षण घेत आहेत.